अहिल्यानगर
प्रवरेचा अश्वमेध ऍग्रीटेक प्रा.लि. यांच्या सोबत शैक्षणिक करार
प्रवरानगर प्रतिनिधी : लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाद्वारे अश्वमेध ऍग्रिटेक आणि फार्म सोल्यूशन प्रा.लि.कोपरगाव या नामांकित कंपन्यांशी औद्योगिक -शैक्षणिक सामंजस्य करार झाला असल्याची माहिती प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे आणि ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
या सामंजस्य काराराद्वारे संस्थेअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी मेळावे, विस्तार शिक्षण, अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन व नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती अश्वमेध ऍग्रिटेक आणि फार्म सोल्यूशन प्रा.लि.चे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी दिली.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय नेते मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध सामंजस्य काराराद्वारे ग्रामीण भागातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कृषिचे आद्यवत व सखोल ज्ञान मिळावे या हेतूने यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे.
या शैक्षणिक करारावर संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, कृषी व्यवसाय व्यवस्थापनचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी जैवतंत्रज्ञानचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी करारवर स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी अश्वमेध ऍग्रीटेक प्रा. लि.चे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, डॉ. सत्यनारायण, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, कृषी महाविद्यालयाचे प्रा.दासपुते आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापनचे प्रा. धीरज कारले तसेच प्रा. रमेश जाधव, प्रा. अमोल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कराराबद्दल लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. मा. अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, विश्वस्त आ. आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे यांनी अश्वमेध ऍग्रीटेक प्रा.लि.चे यांचे आभार मानले.