अहिल्यानगर

विज पडुन जळालेला ट्रांसफार्मर तातडीने दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

व्हिडीओ : विज पडुन जळालेला ट्रांसफार्मर तातडीने दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी


आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव
खुडसरगांव-माहेगाव शिव रस्त्यावरील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसात विज पडून ट्रांसफार्मर जळून खाक झाला होता. या ट्रांसफार्मरची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

राहुरी तालुक्याच्या पुर्वभागात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिंकासह झाडेझुडपे उमळुन पडुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये जोराचा वारा, पाऊस असल्याने विजेचा कडकडाट झाल्यामुळे खुडसरगांव-माहेगाव शिवरस्त्यावरील थेवरकर ट्रांसफार्मरवर विज कोसळुन जागीच जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचार्यांना दुरुस्तीची विनंती केली असता बिले भरण्याची सक्ती केली. पंरतु शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना बिल भरणार कुठुन ? असा सवाल येथील शेतकरी वर्गामधून केला जात आहे. त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालून नवीन ट्रांसफार्मर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अशोक आढाव, बापूसाहेब येवले, आप्पासाहेब थेवरकर, राजेंद्र देठे, अनिल देवकर, सुशिल काळे, शिवाजी पवार, रामकिसन चव्हाण, विठ्ठल चव्हाण, धर्मा चव्हाण, रोहिदास देवकर, सुभाष गुरसळ, राजेंद्र क्षिरसागर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button