छत्रपती संभाजीनगर
मुरम्यात शिवजंयती उत्साहात साजरी
पाचोड : छत्रपती शिवाजी महाराज यांची मुरमा (ता.पैठण) येथे जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची रामनाथ लेंभे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. यावेळी गावातील बारा वर्षाखाली मुलांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे पोशाख परिधान केले तर मुलीँनी माँ साहेब जिजाऊ यांचे पोशाख परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर भाषणे केली.
सर्वप्रथम पहिलीतील गोपाल संतोष मानमोडे यांनी “एकच राजे इंथे जन्मले” या गीतापासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी जयश्री मोठे, तनुजा मानमोडे, भक्ती काटे, भक्ती मानमोडे, वैद्यवी मगरे, वैष्णवी मानमोडे, श्रेया काटे, पल्लवी मापारी, गौरी गायकवाड, दिव्या भोसले, नेहा मगरे, जयश्री मोरे, प्रतिक्षा मोरे, आंकेश मगरे, श्रेया मगरे यांनी भाषणांत सहभाग घेतला तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रूपाली लेंभे हीने केले. या कार्यक्रमासाठी गावचे पोलिस पाटिल विश्वनाथ मगरे, ग्रा.पं.सदस्य गणेश नेमाणे, शालेय समिती अध्यक्ष आपासाहेब फटांगडे, उपध्यक्ष ऋषी काटे, अक्षय लेंभे, बळीराम मापारी, सोनू आहेर, राजू भेरे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.