महाराष्ट्र
क्रांतिसेनेच्या जालना युवक आघाडी संघटकपदी हिवाळे
जालना:अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या जालना जिल्हा युवक आघाडी संघटकपदी जालना शहरातील लढाऊ कार्यकर्ते जितेंद्र हिवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.क्रांतीसेनेचे सरचिटणीस नितीन भैय्या देशमुख यांनी जितेंद्र हिवाळे यांना नियुक्ती पत्र दिले.
या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी मंत्री डॉ शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील,शिक्षक क्रांतीसेनेचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडेपाटील, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील, अखिल भारतीय किसान क्रांतीसेनेचे मराठवाडा अध्यक्ष कृष्णा सावंत, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम पाटील, संपर्क प्रमुख साईनाथ कासोळे पाटील,राजु शेरे आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.