कुलसचिव पदी राजेंद्रकुमार पाटील यांच्या नियुक्तीचे स्वागत

राहुरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदी राजेंद्रकुमार पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना अखिल भारतीय क्रांती सेनेचे राज्य संपर्कप्रमुख तथा पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य मधुकर म्हसे पाटील व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
राजेंद्रकुमार पाटील यांनी दुसऱ्यांदा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. याआधी श्री पाटील यांनी कृषी विद्यापीठ प्रशासनात अत्यंत महत्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्याकडे असलेला प्रशासकीय अनुभव, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुणांचा विद्यापीठाच्या प्रगतीस निश्चितच फायदा होणार आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या स्वागतप्रसंगी अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने राजेंद्रकुमार पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि विद्यापीठ प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.