राजकीय

आरक्षण सोडतीनंतर भाजप ओबीसी युवा मोर्चा कडुन आनंदोत्सव साजरा

राहुरी : अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीत जिल्हा परिषदेचा सात्रळ गट ओबीसी साठी राखीव तर सात्रळ गण व कोल्हार खुर्द गण सर्वसाधारण साठी राखीव झाला म्हणून नगर दक्षिण भाजपाच्या ओबीसी युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोनगाव चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
मा. कोर्टाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष पाठपुरावा केला. तर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांनी आरक्षण रद्द झाल्यानंतर प्रत्यक्षात ओबिसी साठी प्रवरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे दरवाजे खुले करून ओबीसी समाजाला खरा अर्थाने न्याय दिला.
या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रापंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वूमीवर ओबीसी आरक्षणाचे स्वागत करताना प्रत्यक्षात आरक्षण नसताना ओबीसींसाठी विशेष सहकार्य केल्याने ना. विखे पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे विशेष आभार मानले. सोनगाव चौकात फटाके वाजवून आरक्षणाचे व विशेष म्हणजे सात्रळ गट ही ओबीसी साठी राखीव झाला म्हणून स्वागत करून आनंद साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
यावेळी ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे, जिल्हा सरचिटणीस बिपिन ताठे, सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, व्हा.चेअरमन नारायण धनवट, संचालक शामराव अंत्रे, विनोद अंत्रे, विखे पाटील कारखान्याचे संचालक सुभाष पाटील अंत्रे, मा संचालक पाराजी धनवट, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष मोहंमद तांबोळी, शब्बीर तांबोळी, न्हंनु पिंजारी, संजय कानडे, प्रदीप दिघे, कैलास जाधव, आण्णासाहेब ताजने, प्रशांत अंत्रे, संदीप आनाप, रमेश अनाप, कैलास अनाप, संपत अंत्रे, बापूसाहेब अंत्रे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ओबीसी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button