अहमदनगर

परमेश्वराच्या तारणदायी कार्यात पवित्र मरिया, तिचे संपूर्ण समर्पण आपण स्वीकारावे- फा. मार्कस रुपटक्के

हरिगाव मतमाउली यात्रापूर्व पाचवा शनिवार नोव्हेना संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव येथील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व पाचव्या शनिवारी नोव्हेना भक्ती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मतमाउली मूर्तीची पालखी मिरवणूक चर्च प्रांगणात झाली. त्यावेळी भाविक, सर्व धर्मगुरू सहभागी झाले होते.
या शनिवारी “परमेश्वराच्या तारणदायी कार्यात पवित्र मारिया”या विषयावर सेंट जॉन चर्च सिडको, औरंगाबाद येथील प्रमुख धर्मगुरू मार्कस रूपटक्के यांनी पवित्र मिस्सा अर्पण करून प्रवचन करताना प्रतिपादन केले की, पवित्र देवमातेचे मानवाच्या तारणकार्यामध्ये योगदान यावरती आपण मनन व चिंतन करणार आहोत. पवित्र मरीयेचा होकार हा सदेष्ट्या व्दारे दिल्या गेलेल्या वाचनाची परिपूर्णता होती आणि म्हणूनच तिचा हा होकार केवळ योगदान नव्हे तर तिचे संपूर्ण असे समर्पण म्हणून आपण स्विकारायला हवे.
पुष्कळ वेळेला आपण पवित्र मरीयेला एक सामान्य स्त्री म्हणून आपण तिचा विचार करीत असतो. परंतु संपूर्ण जगताने या मातेव्दारे दिले गेले समर्पण याचेवर मनन चिंतन करण्याची आज गरज आहे. ती सार्वकालिक जीवनाची व मानवजातीची माता आहे. या मातेने आम्हाला तिच्या पुत्राकडे नेण्यासाठी ती सदोदित प्रयत्न करते. आजचे शुभ वर्तमान योहानाच्या शुभवर्तमानातून वाचणार आहोत. प्रेशितीय कार्यामध्ये पवित्र मारीयेने प्रगट अथवा अप्रगटपणे ख्रिस्ताला त्याच्या प्रेशितीय कार्यामध्ये मदत केली. काना गावाच्या त्या लग्नामध्ये लग्नासमयी तिने नेतृत्वाचा झेंडा हातात घेवून आपल्या पुत्राला विनंतीवजा माहिती पुरवली की या लोकांना आता मदतीची गरज आहे. हे माता आम्हा प्रत्येकाला ख्रिस्ताकडे घेऊन जात असताना तिच्याकडून आम्हासाठी सदैव दया याचना ती करत असते. या मातेव्दारे आपण आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करू या, तिचा जन्म सोहळा आपण योग्य रीतीने साजरा करावा म्हणून आपण आपली अध्यात्मिक तयारी करू या व ख्रिस्त आमचा गुरु, ख्रिस्त आमची माउली, त्याची आई माता मरिया तिचा योग्य असा सत्कार व सन्मान करावा म्हणून आजच्या दिवशी तिच्या चरणी प्रार्थना करू करण्यात आली.
या नोव्हेना प्रसंगी हरिगाव चर्च प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, नित्य सहाय माता चर्च अशोकनगर धर्मगुरू मुक्तीप्रसाद, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button