अहिल्यानगर
मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण त्वरित लागू करा- वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण त्वरित लागू करा, मोहम्मद पैगंबर बील मंजूर करा यांसह विविध मागण्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन देणयात आले.
श्रीरामपुर युवा तालुका अध्यक्ष सुमेध पडवल यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हा सचिव सुनिल ब्राह्मणे, युवा जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन, युवा उद्योजक क्षीरसागर, मधुकर साळवे, ॲड मोहन, युवा सचिव शिंदे, किशोर ठोकळ, तालुका संघटक खंदारे आदी उपस्थित होते.