महाराष्ट्र
संभाजी दहातोंडे यांची मराठा महासंघाच्या संयुक्त सरचिटणीस पदी नियुक्ती
राहुरी शहर /अशोक मंडलिक : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संयुक्त सरचिटणीसपदी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई येथे आज रविवारी (ता. 21) रोजी झालेल्या मराठा महासंघाच्या पदाधिकारी बैठकीत महासंघाचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी सर्वानुमते ही निवड केली आहे. या निवडीमुळे संभाजीराव दहातोंडे यांच्यावर मराठा महासंघातील प्रमुख तीन जबाबदाऱ्या आल्या आहेत.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची ॲड. शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दि. 21 नोव्हेंबर रोजी दादर येथील शिवाजी मंदिरात झाली. अखिल भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस दिलीपराव जगताप, उपाध्यक्ष संतोष नानावटे यांच्यासह महाराष्ट्रातील पदाधिकारी, जिल्हा, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत सर्वानुमते शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे पाटील यांची संयुक्त सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे ॲड. पवार यांनी जाहीर केले. 3 ऑक्टोबर 2021 रोजी पुण्यामध्ये झालेल्या सभेत पदाधिकारी बेकायदेशीर असून त्या नियुक्त्या रद्द करत असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले. तसेच मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन परत बैठक लावणार असल्याचे सांगण्यात आले.