गुन्हे वार्ता

देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त

• एकाच वेळी पाच ठिकाणी छापे, एकूण 95100 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
• डीवाय.एस.पी संदीप मिटके व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त पथकाची कारवाई…
राहुरी शहर/अशोक मंडलिक : आज दि.20 नोव्हेंबर 2021 रोजी डीवाय.एस.पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत, अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन 1950 लिटर, तयार गावठी हातभट्टी दारू 125 लिटर असा एकूण 95,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. त्यानुसार, सोमनाथ माधव बर्डे, इंदुबाई माळी (पूर्ण नाव माहीत नाही), 3 अज्ञात (फरार) सर्व राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी यांचेविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (फ) नुसार PC नितीन शिरसाठ नेमणूक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांचे फिर्यादीनुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, डीवायएसपी नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क), पीआय हुलगे, पीआय कोल्हे, पीएआय अहिरराव, एएसआय राजेंद्र आरोळे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.

Related Articles

Back to top button