पैठण आगार सलग चौथ्या दिवशीही बंद
◾क्रांतीसेनेचा आंदोलनाला पाठिंबा
विलास लाटे/पैठण : पैठण आगार येथील कर्मचारी सलग चौथ्या दिवशीही आपल्या भूमिकेवर ठाम असून राज्य शासनात विलिनीकरण करे पर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू ठेवणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाचे अध्यक्ष संतोष तांबे यांनी आंदोलन स्थळी भेट देत, सदर आंदोलनास पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे.
राज्यात लालपरी थांबली असून सलग चौथ्या दिवशी एस टी कर्मचारी आपल्या मागणी वर ठाम आहेत. राज्यात विविध ठिकाणी आंदोलन स्थळी जाऊन अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाच्या वतीनं पाठिंबा देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून पैठण आगाराच्या आंदोलन स्थळी क्रांतिसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्याच्या सोबत संदीप तांबे, तुषार नाटकर होते.
यावेळी रमेश पवार, भास्कर झारगड, गणेश रावस, शंकर कोल्हे, गणेश मैईंदड, लक्ष्मण दौंड, संतोष खरात, मचिंद्र सांगळे, अंकुश खाडे, विनोद बागले, सचिन मूचूटे, संतोष घेवारे, मनोहर घुले, नितीन केसभट, सोमनाथ वाकडे, गोविंद शिरसाठ, सोमनाथ कदम, जितेंद्र नाईक, भगवान नाटकर, गणेश थोरे यांच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.