अहिल्यानगर
रिपब्लिकन सेनेची संगमनेर येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य प्रमुख सागर डबरासे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हाप्रमुख राजू आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील संगमनेर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली.
संगमनेर येथील सिद्धार्थ हायस्कूल येथे तालुका प्रमुख संदीप तुकाराम मोकळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संगमनेर तालुक्यातील जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून नवीन काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. संगमनेर शहर प्रमुख म्हणून अमोल पराड, अस्लम पटेल, अमोल शेळके यांची तालुका उपप्रमुख तर जिवेंद्र भोसले सचिव, सुधीर मोकळ संघटक पदी निवड करण्यात आली.
प्रसंगी ग्रामीण भागात दलित आदिवासी भटक्या विमुक्त जाती वस्त्यांमध्ये शासनाच्या घरकुल योजना गोरगरिबांना तसेच खऱ्या लाभार्थीना मिळत नसल्याने संगमनेर पंचायत समितीच्या निषेधार्थ तसेच मागासवर्गीयांवर होणारे अन्याय अत्याचार कसारे येथील मागासवर्गीय सरपंचावर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने लवकरच मोर्चा काढावा याबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी जिल्हाप्रमुख राजू आढाव व जिल्हा ऊपप्रमुख गंगा विधाटे यांनी संघटनेचे ध्येय धोरणे बाबत मार्गदर्शन केले आणि लवकरच मोर्चा काढण्याचे ठरले.
यावेळी राहुरी तालुका युवक प्रमुख विनोद पवार, अंजुमभाई पटेल, तालुका प्रमुख संदीप मोकळ, महासचिव बच्चन भालेराव, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अंजनाबाई भालेराव, शहर उपप्रमुख योगेश बैरागी, ता.कार्याध्यक्ष अजय खरात, सचिव विजय जगताप, सुधाकर वाघमारे, चंद्रशेखर संगमकर, माणिक हाटकर, अशोक रोहम, ऊमर बागवान, सोनाली जगताप, शोभा रोहम इ.पदाधिकारी उपस्थित होतेे. शेवटी बच्चन भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले .