पावसाने लावली दैना तरीही ग्रामसेवक गावात येईना…
◾पैठण तालुक्यातील दादेगाव येथील प्रकार
विजय चिडे/पाचोड : ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. मात्र पैठण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दादेगाव ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून शहरातून ‘अपडाऊन’ करतात. त्यामुळे गावविकासाला ‘खीळ’ बसत आहे. सध्या पावसाने हाहाकर माजवला असल्याने गावातील नागरिक संकटात सापडत असतानाही दादेगावचे ग्रामसेवक गावत सापडत नसल्याने गावकऱ्यांच्या तोंडातून ग्रामसेवक गावात येईना कशी सांगु हो साहेब तुम्हाला आमच्या गावाची दैना असे भावना व्यक्त करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सरकारने कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र,पैठण तालुक्यातील दादेगावचे ग्रामसेवक मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले सादर करीत असतात. गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय देखील घेतला आहे. मात्र, सदर निर्णयाची दादेगाव येथे पायमल्ली होताना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांचा असलेला दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
गावात ग्रामसेवकांच्या हलर्गीजी पणामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी वास्तविकता या गावाची झाली आहे. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचा डोलारा असल्याने स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आदी दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला उपस्थित असते. या ग्रामसेवाकांना गावातील कोणता वॉर्ड कुठे आहे? याची साधी माहिती देखील त्यांच्याकडे नसते.
गावात कोणत्या समस्या आहेत, कोणती कामे करायची आहेत याची साधी कल्पना नसते. कारण गावात कधी फिरकूनही पाहत नाहीत. गाव म्हटले की समस्यांचा जणू पाढाच असतो असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतात. तरी दादेगावच्या ग्रामपंचायतमध्ये महिना महिना ग्रामसेवकांचे तोंड पाहिले नसल्याचे गावकरी सांगतात. त्यातच सर्वच ग्रामसेवक ‘अप डाऊन’ करीत असतात. मुख्यालयी कुणीही राहत नसून अशी एकंदरीत विदारकता असल्याने आता तुम्हीच सांगा गावाचा विकास कसा साधणार असा प्रश्न गावातील नागरिकांनी केला आहे. या संदर्भात ग्रामसेवक यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला आहे.