शिक्षणवारी ज्ञान पंढरी
देवळालीचे पालक शिक्षक संघ नियमानुसार गठीत करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश
आप्पासाहेब ढुस यांच्या मागणीला यश
अहमदनगर प्रतिनिधी : देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पालक शिक्षक संघ नियमानुसार गठीत करण्याचे शिक्षण विभागाने नुकतेच आदेश दिले आहेत.
देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे बेकायदेशीर पालक शिक्षक संघ तात्काळ बरखास्त करून शासन निर्णय मधील तरतुदीनुसार पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी दि. २५ ऑगस्ट रोजी या शाळेत शुल्क माफीसाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलन प्रसंगी शाळेला निवेदन दिले होते. व त्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरेे यांना इमेल द्वारे पाठविले होते.
सदर निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी राज्याच्या शिक्षण विभागाला पाठविले होते. शिक्षण विभागाने आज या निवेदनावर नियमानुसार कार्यवाही करून तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव आणि देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्य विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना शिक्षण विभागाने लेखी आदेश दिले आहे.