अनुकंप धारकांना तात्काळ शासकीय सेवेत रुजु करा – छावा
विलास लाटे/पैठण : सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय औरंगाबाद सा.बा.प्रा.वि.मंडळ विभागातील अनेक दिवसांपासुन प्रलंबित असलेल्या विविध संवर्गातील अनुकंप धारकांना तात्काळ शासकीय सेवेत रूजु करून घेण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने (दि.२७) सप्टेंबर रोजी विहामांडवा (ता.पैठण) येथे एका कार्यक्रमाप्रसंगी सा.बा.मंञी अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी रोहयो व फलोत्पादन मंञी संदिपान पाटील भुमरे यांची उपस्थीती होती.
अनुकंप धारकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असुन त्या युवकांचे वयवर्ष वाढत जात आहे. सा.बा.विभागाने त्वरित निवेदनाची दखल घेऊन अनुकंप धारकांना तात्काळ न्याय देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांनी निवेदन देऊन केली आहे. मंञी अशोकराव चव्हाण हे विहामांडवा येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थीत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर एरंडे, तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते, ज्ञानदेव शिरवत, प्रभाकर जाधव, अमोन आव्हाड यांच्यासह आदींची उपस्थीती होती.