विजेचा शॉक लागून एक जणं गंभीर जखमी..
◾पैठण तालुक्यातील गावतांडा शिवारातील घटना
विजय चिडे/ पाचोड : रान डुकरांकडून शेतातील पिकांची नासाडी होत असल्याने शेतामध्ये टाकण्यात आलेल्या बायडींग तारेला बेकायदेशीर वीजप्रवाह सोडल्याने एका शेतकऱ्याला जोरदार शाॅक बसून भाजल्याची घटना पैठण तालुक्यातील गावतांडा शिवारात रविवारी (दि.२६) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.
सविस्तर माहीती अशी की, पैठण तालुक्यातील खेर्डातांडा येथिल शेतकरी गोरख नंदलाल राठोड वय(४०वर्षे) हे रविवारी सकाळी गावतांडा शिवारात ते व त्यांचा मुलगा असे दोघे जण शेतात फवारणीसाठी गेले होते. दुपारी दोनच्या दरम्यान फवारणी करुन ते घरी येत असताना रस्तालगतचा शेतकरी सतीश प्रल्हाद बोडले यांच्या शेतातील मालाची रानटी डुक्कर नासाडी करत असल्यामुळे बेकायदेशीर बायडिंग तार बाधांच्या कडेला टाकून त्या तारेला विज सोडलेली होती.
गोरख राठोड हे दुपारच्या दरम्यान घरी निघाले असता त्यांच्या पायाला शॉक लागला अन् ते गंभीर रित्या भाजले गेले आहे. राठोड यांना शाॅक लागल्याचे शेजारील शेतकऱ्यांच्या लक्षात आले अन् त्यांनी त्यास तात्काळ पैठण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र गोरख राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डाँक्टंरानी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ औरंगाबादला पुढील उपचारासाठी हलविण्याचे सांगितल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
शेतात बेकायदेशीर विज प्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या निष्काळजी पणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप जखमीच्या नागरिकांकडून होत आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चव्हाण करीत आहेत.