छत्रपती संभाजीनगर
बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची निवड
विलास लाटे/ढोरकीन : बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदु भाऊ खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.२४) रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय बैठकीत नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी सखाराम मिसाळ यांची तर तालुकाध्यक्ष पदी नंदु गरुटे यांची, तालुका उपाध्यक्ष पदी भिवा येळे, तालुका सचिव पदी राजु चाबुकस्वार, कार्याध्यक्षपदी केशव कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष खोतकर, भारतमुक्ती मोर्चा चे तालुकाध्यक्ष शिवराम काळे यांनी अभिनंदन करत पार्टीच्या वाढ विस्तारासाठी समाजात जाऊन मूलनिवासी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या समस्या समजावून त्यांचे निवारण व त्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढण्यास अहो रात्र आपला वेळ देतील अशी आशा व अपेक्षा व्यक्त केली व पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.