महाराष्ट्र

एसटी महामंडळ, कामगारांच्या समस्या सोडवा : छावा युवा संघटना

कोल्हापूर प्रतिनिधी : एसटी महामंडळ, कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी छावा युवा संघटनेने दंड थोपटले असुन‌ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला या समस्यांचे निवेदन देण्यात आले आहे. सदर चे निवेदन उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्विकारले आहे.


एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, प्रवासी कर 17.5 % जो आहे तो कर्नाटक राज्याप्रमाणे कमीतकमी करावा, एसटी महामंडळाची सध्याची अवस्था पाहता एसटी टोल मुक्त करावी, डिझेलच्या दरामध्ये शासनाने सवलत द्यावी, राज्यातील इतर महामंडळाप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करावा, शासकीय नोकरदारा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळवा, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

एसटी महामंडळात काम करणाऱ्या बांधवांच्या सर्व मागण्या मान्य करून सरकारने त्यांना दिलासा द्यावा.सदर निवेदनाची दखल सरकारने घेलती नाही तर कोल्हापूर आगार 1 दिवस बंद करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांना पाठविण्यात आले आहे.

एसटी चालक सुभाष तेलोरे यांनी कालच संगमनेर बस स्थानकात आत्महत्या केली आहे. जोपर्यंत शासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तोपर्यंत अशा आत्महत्येच्या घटना घडतच राहतील. त्या लवकर थांबल्या पाहिजे.
_शिवश्री रामदास शिवाजी गांजवे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, छावा युवा संघटना

Related Articles

Back to top button