छत्रपती संभाजीनगर

ऑनलाइन गायन स्पर्धेत जिल्ह्यातून चिन्मय पोकळे यांनी पटकावला प्रथम क्रमांक

फोटो : पैठण ऑनलाइन गायन स्पर्धेतील प्रथम पारितोषक राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते स्विकारताना चिन्मय नामदेव पोकळे सह आदी.

विलास लाटे/पैठण : दि महाराष्ट्र राज्यजुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबाद आयोजित ऑनलाईन गायन स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती . या स्पर्धेमध्ये बाल गटातून आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण या शाळेचा चिन्मय नामदेव पोकळे या विद्यार्थ्याने बाल गटात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. सोमवार रोजी आर्यभट्ट हॉल सिडको औरंगाबाद येथे या स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी चिन्मय पोकळे यांने प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

औरंगाबाद येथे आर्यभट्ट हॉल सिडको औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, शिक्षणाधिकारी बी .बी. चव्हाण, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, महिला बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, समाज कल्याण सभापती मोनाली  राठोड, माजी सभापती विलास बापू भुमरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, नामदेव महाराज पोकळे सह आदीच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला. 

यावेळी चिन्मय नामदेव पोकळे यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल स्मृतिचिन्ह पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button