सामाजिक

प्रहार दिव्यांग संघटनेकडून औषध उपचारासाठी आर्थिक व जीवनावश्यक किराणा किटची मदत

राहुरी प्रतिनिधी : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नामदार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली “जे का रंजले गांजले त्यास म्हणू जे आपले! तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील दिव्यांग दांपत्य अरुण पटारे यांना ब्लड कॅन्सर झाल्यामुळे ऑपरेशन करावे लागले. त्यांचा आर्थिक खर्च त्यांची दिव्यांग पत्नी आशा पटारे यांना गळ्यातील मंगळसूत्र मोडून करावा लागला. परिस्थिती खूपच हलाखीची, छोटीशी पान टपरी चालू परंतु कोरोना महामारीमुळे बंद पडली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यात आजारपणाचा खर्च करणे कठीण झाले. प्रहार दिव्यांग संघटनेकडून त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून औषध उपचारासाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत व जीवनावश्यक किराणा किट देण्यात आली.

प्रहार दिव्यांग संघटना कायम दिव्यांगांना काहीना काही मदत करत असते. या दिव्यांग दांपत्याना कुणाला मदत करण्याची इच्छा असेल अशांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे तालुका सचिव योगेश लबडे यांनी केले. 

या उपक्रमासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा संघटक आप्पासाहेब ढोकणे, प्रहारचे उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, राहुरी तालुका प्रहारच्या महिला अध्यक्षा रुपाली जाधव, उपाध्यक्षा छायाताई हारदे, देवळाली शहराध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष अनिल मोरे, टाकळीमियाँ शाखाध्यक्ष ह.भ.प. नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दानवे, ब्राम्हणी शाखाध्यक्ष बाबुराव शिंदे, बा. नांदूर शाखाध्यक्ष राजेंद्र आघाव, प्रहार संघटक दत्तात्रय खेमनर, राहुरी खुर्दचे उपसरपंच तुकाराम बाचकर, प्रहारचे तालुका कार्याध्यक्ष संजय देवरे, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी, शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले, प्रहार संघटक लक्ष्मण सोनवणे, कागळेमामा, सुखदेव कीर्तने आदी मान्यवरांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button