अहिल्यानगर
वळण येथे संगित प्रवचन सोहळा
व्हिडीओ : संगित अलंकार गायनाचार्य ह.भ.प.सुनीलजी महाराज पारे यांचे संगित प्रवचन.
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील वळण येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने संगित अलंकार गायनाचार्य ह.भ.प.सुनीलजी महाराज पारे यांचे संगित प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
लहानपणापासून धार्मिक क्षेत्रात आवड असल्याने गायनाच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेले सुनिल महाराज पारे हे अहमदनगर येथील संगित अलंकार प्रा.आर.एन.भनगडे यांच्याकडे संगित विशारद हि पदवी प्राप्त करून आता संगित अलंकार हे शिक्षण घेत आहे. गुरुवर्य ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे ताराहबाद यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्माचे शिक्षण घेत आहे. ग्रामस्थाच्या सहकाऱ्यांने संगित प्रवचन करण्याची संधी मिळाली आहे.
या कार्यक्रम प्रसंगी साथसंगत हार्मोनियम वादक बाळासाहेब महाराज गोसावी, मृदंगाचार्य ह भ प पवन महाराज खुळे, मच्छिंद्र महाराज डमाळे, विठ्ठल महाराज आढाव, गोपीनाथ खुळे गुरुजी, सुभाष महाराज रंधे आदींनी केली. यावेळी गावातील भजनी मंडळी व भाविकभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.