अहिल्यानगर

माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधवांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल साहित्यिकांतर्फे सत्कार संपन्न

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र नामदेवराव जाधव यांना नुकतीच शिक्षणक्षेत्रातील सन्माननीय अशी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल वाचन संस्कृती प्रतिष्ठान, साहित्य प्रबोधन मंच, साहित्य परिवार, साहित्य मित्रमंडाळातर्फे श्रीरामपूर शासकीय विश्रामगृह हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.

वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून सांगितले की, डॉ.रामचंद्र जाधव हे शिक्षण उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाले तरी त्यांनी अभ्यास आणि संशोधन कार्य सुरु ठेवले ही अतिशय प्रेरणादायी वाटचाल आहे.त्यांनी लिहिलेले “अंधाराकडून उजेडाकडे “हे आत्मकथन खूपच प्रभावी आहे,डॉ.जाधव हे श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयातील अर्थशास्राचे अतिशय हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी गुणवत्तेने रयत शिक्षण संस्थेत शिक्षक प्रथम कार्य कार्य केले. नंतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले.शिक्षण विभागात उच्चपदावर भरीव कार्य केले, आणि आता त्यांनी केलेल्या विशेष शैक्षणिक संधोधन कार्याबद्दल अमेरिकन कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी गोवा विद्यापिठाच्या भव्य पदवी सोहळ्यात अर्पण करण्यात आली हे कौतुकास्पद आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद वाटतो असे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.

यावेळी साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथेसह साहित्य मित्रपरिवार आणि सुभाष त्रिभुवनसह डॉ. जाधवमित्रपरिवार उपस्थित होते, डॉ. रामचंद्र जाधव यांनी कॉलेजमधील आठवणी सांगून साहित्यिकांतर्फे झालेला सत्कार मला सदैव प्रेरणादायी ठरेल आणि लेखन, समाजसेवेस बळ देईल असे सांगून या सत्कारातून जनतेची सेवा आणि चांगले काम करण्याचे सत्कार्य सुरु राहणार आहे. स्वामीराज कुलथे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button