अहिल्यानगर
देशप्रेमींनी केला आगळ्यावेगळ्या पध्दतीने स्वातंत्र्य दिन साजरा
व्हिडिओ : देशप्रेमी काळे कुटुंबियांकडून स्वातंत्र्य दिन साजरा
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे कोरोनामुळे शाळा बंद असल्याने देशावर प्रेम करणार्या काळे परिवाराने घरच्या घरीच ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.
स्वातंत्र्य दिन घरातल्या घरात नवीन कपडे परिधान करून घरासमोर सडा, रांगोळी काढून उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला आहे. या आगळ्यावेगळ्या पध्दतीच्या कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमात मच्छिंद्र काळे, जालिंदर काळे, दिलीप काळे, विलास काळे, शुभम काळे, श्रुती काळे, गौरव काळे, सिद्धार्थ काळे, प्रिती काळे, ताराबाई काळे, ईश्वरी काळे, कुणाल काळे, सुदर्शन काळे, आदवीक काळे, सीना काळे, मनिषा काळे, ज्योती काळे, शिवंण्या काळे आदी सदस्य सहभागी झाले होते.