महाराष्ट्र
राज्यस्तरीय आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेत कटारे याचे सुयश
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : मा.खासदार गोविंदरावजी आदिक यांच्या स्मृती दिनानिमित्त सार्थक बहुउद्देशिय संस्था श्रीरामपूर आयोजित राज्यस्तरीय आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेत डी.डी.काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूरचा विद्यार्थी चि.सिध्देश अशोक कटारे याने विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक पटकावला.
सदर बक्षिसाचे वितरण करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, नगरसेवक राजेंद्र पवार, अल्तमेश पटेल, रईसभाई जहागिरदार, प्रकाश ढोकणे, दिपक चव्हाण, लकी सेठी, कैलास बोर्डे, योगेश जाधव, अमान खान, सार्थक चे शकिल बागवान, उमेश तांबडे, शिरीष सुर्यवंशी, शुभम केणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या वतीने रोख १००० रू.चे विशेष पारितोषिकही चि.सिध्देशला मिळाले. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील ९७ स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच युवक बिरादरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेतही चि.सिध्देशने तृतीय क्रमांक मिळवुन ट्राँफी, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक पटकावले आहे. चि.सिध्देश हा न्यू इं.स्कूल निमगावखैरी विद्यालयातील अशोक कटारे व गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकरच्या संगीता फासाटे यांचा मुलगा आहे. आजपर्यंत त्याने अनेक विविध जिल्हा व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेले आहे. त्याच्या या यशाबद्दल खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चेअरमन पुष्पाताई आदिक, अध्यक्ष प्रा.डॉ.बबनराव आदिक, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, सचिव अविनाश आदिक, सहसचिव अँड.जयंत चौधरी, सर्व गव्हनिँंग कोंन्सिल सदस्य, अँड.विजयराव बनकर, जयाताई जगताप, जेष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई, ख्यातनाम तबला साधक अनिलजी डोळे. अवधूत कुलकर्णी, प्रा.गणेश शिंदे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाश कुलथे, जेष्ठ पत्रकार व छायाचित्रकार बी.आर.चेडे, सुनील साळवे, संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.