महाराष्ट्र

क्रांतीवीर भागोजी नायकांची समाधी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा

सिन्नर प्रतिनिधीतालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाची आढावा बैठक सांगवी येथील क्रांतीवीर भागोजी नाईक समाधी स्थळी आयोजित केली होती.
     एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 

येणार्या काळात क्रांतीवीर भागोजी नायकांची समाधी महाराष्ट्रात एक नंबरचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल, असा विश्वास येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विनायक घुमरे हे होते. या प्रसंगी महासचिव डॉ राहुल आहिरे, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अध्यक्ष तुषार आहिरे, नाशिक जिल्हा संघटक चंद्रशेखर रोकडे, सिन्नर तालुका अध्यक्ष रामदास बर्डे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, महिला प्रदेशाध्यक्ष सुषमा बोरसे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष आप्पा माळी, भांगरे सर, स्नेहा घुमरे,अंजना घुमरे, ज्योती रायते, योगेश घुमरे, संजय घुमरे, विजय गवळी, अमोल घुमरे, पप्पू माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button