अहिल्यानगर

वळण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुणगे यांचा सत्कार

आरडगांव येथे अध्यक्ष गोविंदराव फुणगे यांचा सत्कार करताना सौ.उज्वलाताई व पत्रकार राजुभाऊ आढव.

राहुरी प्रतिनिधी : तालुक्याच्या पुर्वभागातील धडाडीचे पत्रकार गोविंदराव फुणगे यांची वळण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आरडगांव येथील दै.सार्वमतचे पत्रकार राजेंद्र आढाव व सौ.उज्वलाताई आढाव यांच्या हस्ते निवासस्थांनी सत्कार करण्यात आला.

   ‌‌व‌‌ळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गोविंद सारंगधर फुणगे यांची तर उपाध्यक्षपदी आशाताई दत्ताञय खुळे यांची निवड सरपंच सुरेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालक मेळाव्यात करण्यात आली. या कार्यकरणीवर गायत्री खुळे, आश्विनी आढाव, माया विधाटे, वर्षा खिलारी, अलका मकासरे, सुभाष ठुबे, रविंद्र गोसावी, सुनिल पारे, मच्छिंद्र काळे, मोबिन पठाण, राजेंद्र चव्हाण, संदिप शेळके, अनुष्का खुळे, ओंकार डमाळे, सचिव मुख्याध्यापक हनुमंत चौधरी आदिंची देखील निवड करण्यात आली आहे. यावेळी नुतन अध्यक्ष गोविंद फुणगे यांनी सांगितले की, कोरोना मुळे शिक्षक -विद्यार्थी पालक यांच्या मध्ये काहीसा संवाद कमी झाला आहे.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहीले आहे. त्यामुळे आता पुढील काळात लवकरच शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा सर्व प्रथम प्रयत्न केला जाईल.तसेच शाळेतील कमी असलेले शिक्षक आणण्याचा प्रयत्न करू आणि अपुर्या वर्ग खोल्यांच्या प्रश्नासंदर्भात व नवीन जागेत शाळा स्थलांतरीत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताञय खुळे, अशोक कुलट, मनोज गोसावी, गोपीनाथ खुळे, सुनिल खिलारी, सुनिल पारे, केंद्रप्रमुख मंगला सोळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Back to top button