तक्षज्ञ विद्यार्थी गणेश मित्र मंडळाचा बाप्पाला पारंपारिक वाद्यांच्या गजरात निरोप

आरडगांव | राजेंद्र आढाव : येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचे तक्षज्ञ विद्यार्थी गणेश मित्र मंडळ बाप्पांचे विसर्जन ढोल ताशा या पारंपारिक वाद्यांच्या गजरात करण्यात आले आहे. या भव्य मिरवणूकीतील देखाव्यांनी नागरिकांसह अनेकांची मने जिंकून घेतली होती.
राहुरी शहरातून एका आगळ्यावेगळ्या पध्दतीने बैलगाडीतून भव्यदिव्य अशी मिरवणूक सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने गणेश मूर्ती स्थापनेपासून मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये गणपती बाप्पा बनवणे, मोदक बनवणे, संगीत खुर्ची या सारख्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसेच गणपती महोत्सवादरम्यान राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी मंडळाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब मुसमाडे, प्राचार्य जगदीश मुसमाडे, प्रशासनाधिकारी महेश मुसमाडे, फिजिकल डायरेक्टर राहुल बोरुडे, अफ्रोज सय्यद, रोहित बाचकर, संतोष अनाप, सुरज तनपुरे, गौरी म्हसे, प्रियाली दरंदले- मुसमाडे आदींसह शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.