महाराष्ट्र
		
	
	
अभिमान पुरस्काराने सुंबे सन्मानित
लोणी काळभोर  प्रतिनिधी : एन.टिव्ही न्युज मराठी या वृत्तवाहिनीचा अभिमान पुरस्कार नुकताच हवेली तालुका  पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सचिन सुंबे   यांना देऊन सन्मानित करण्यात आले. 
       सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात पत्रकारितेच्या, हवेली तालुका ग्राहक पंचायतीच्या  व ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अभिमास्पद कामगिरी केल्याबद्दल  त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सचिन सुंबे हे हवेली तालुका ग्राहक पंचायतीचे  प्रसिद्धी प्रमुख  असुन अनेक ग्राहकांचे प्रश्न त्यांनी हवेली तालुका ग्राहक  पंचायत समितीचे अध्यक्ष  संदीप शिवरकर   यांच्या नेतृत्वाखाली सोडविले आहेत . तसेच ते  ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष पदाच्या  माध्यमातून  अध्यक्ष सचिन महाराज माथेफोड यांच्या माध्यमातून अनेक गरजु विदयार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप केले आहे. कोरोनाच्या काळात  अनेक नागरिकांना त्यांनी बेड उपलब्ध करून दिले. तर सहकारी मित्रांना बरोबर घेऊन कोरोना रुग्णांना प्लाजमा उपलब्ध करून दिली आहे.हा पुरस्कार मिळाल्या बद्दल आजी ,माजी खासदार ,आमदार ,जिल्हा परिषदेचे सदस्य ,पंचायत समितीचे सदस्य ,अनेक गावचे आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत  सदस्य ,पोलीस पाटील ,पतसंस्थेचे पदाधिकारी ,अनेक संस्थेचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .
 
				 
  


