महाराष्ट्र

वीज बिल माफ करा-क्रांतीसेनेची मागणी

पैठण : कोविड काळातील सर्वसामान्य जनतेचे व छोट्या उद्योग व्यावसायिकांचे वीजबिल माफ करा अशा आशयाचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने पैठण नायब तहसीलदार अरुण पंडुरे साहेब तसेच महावितरण अधिकारी रंधे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
मागच्या आठ महिन्यांपासून आपले राज्य व संपूर्ण देश कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रस्त आहे.यात लाॅकडाऊन केल्यामुळे याचा प्रभाव कोट्यवधी सर्वसामान्य जनतेवर व छोट्या उद्योग व्यावसायिकांवर पडला आहे.अनेक लोक बेरोजगार झाले आहेत.उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत.आता शासनाने अनलॉक जरी केले असले तरीही अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही.हातावर पोट असलेल्या लोकांच्या दोनवेळच्या जेवणाची अजूनही भ्रांत आहे.अशातच राज्य वीज वितरण कंपनी महावितरण ने वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले दिली आहेत.आता ही वाढीव वीज बिले भरणार कुठून असा यक्ष प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर व छोट्या उद्योग व्यवसायिकांसमोर निर्माण झाला आहे.एकीकडे उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद आहेत आणि दुसरीकडे या अश्या प्रकारे महावितरण कडून वाढीव वीजबिल आकारणी करून जनतेची निव्वळ लूट केली जात आहे.यामुळे आधीच हवालदिल झालेली जनता व छोटे उद्योग व्यावसायिक अधिकच पिळले जाणार आहेत आणि कोविंड-19 च्या काळात यांनी मिटर रिडींग प्रमाणे बील न देता मनमर्जी ने बिल आव्वाच्या सवा लावण्यात आले जर आता हे नाही थांबले तर अखिल भारतीय क्रांतीसेना यावर तीव्र आंदोलन करेल.असा इशारा क्रांतीसेनेची तालुकाप्रमुख लक्ष्मण शेलार,गणेश औटे,गोपाल औटे यांनी दिला आहे.यावेळी विशाल तांबे, निलेश देशमुख, सिद्धार्थ बागुल, चिराग फारुख, विशाल खाडे, निखिल शिंदे , किरण  घोडके , सुयोग हातागळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button