ठळक बातम्या
पावसाची उघडीप झाल्यावर त्वरित नगर मनमाड रस्त्याची दुरुस्ती; जागतिक बँक प्रकल्प ( सा. बा.) विभाग अहमदनगर
जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांचे अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांना पत्र…
राहुरी : अहमदनगर-मनमाड रस्त्यावरची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी डांबर मिश्रित खडी पद्धतीने करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला होता.सध्या पाउस सुरु असून पावसाने सरासरी ओलांडली आहे.१४३% पाउस पडला असून अवजड वाहनामुळे रस्ता खराब होत आहे.त्याकरिता खडी मुरुमाने तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत आहे.पावसाची उघडीप होताच डांबर मिश्रित खडीने त्वरित रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात येईल असे अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांना एन एम राजगुरू कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग अहमदनगर यांनी जा.क्र प्रशां/१६४६/२०२० दिनांक १८ सप्टे च्या पत्रान्वये नुकतेच कळविले आहे.
नगर मनमाड रस्त्यावर पावसाळ्यात ३० ते ४० मे.टन मालवाहतूक ट्रक,कंटेनरने होत असते.त्याकरिता अर्थसंकल्पीय कामात समावेशना नुसार रस्ता गुणवत्तापूर्वक तयार करण्याबाबत दक्षता घेण्यात येईल.मधुकर म्हसे यांच्या मागणीनुसार रस्त्यावर अपघात झाल्यास ५ कोटी रु नुकसान भरपाई देणेबाबतची बाब या कार्यालयाचे कक्षात येत नाही असेही कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.मधुकर म्हसे यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदींना निवेदन पाठवून नगर मनमाड रस्त्यावर रस्ता खराब असल्याने अपघात घडतात अनेकांचे मृत्यू झालेत.काही अपंग झाले.रस्ते खड्डे बुजविले जातात पण परत खराब होतात.रस्त्यावर अपघात झाल्यास अपघाती व्यक्तीला रु ५ कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणीही केली होती.या निवेदनाची तातडीने दखल घेतल्याने व प्रश्न मार्गी लावल्याने,व संघटना मजबूतपणे क्रांतीसेनेचे कार्य करीत असल्याबद्दल मधुकर म्हसे पाटील यांचे पश्चिम महाराष्ट्र क्रांतीसेना अध्यक्ष भागचंद औताडे,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख बी आर चेडे,नगर जिल्हा क्रांतीसेना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.