अहिल्यानगर

क्रांतीसेनेच्या तालुकाध्यक्षपदी कोल्हे यांची निवड

संगमनेर प्रतिनिधी: कोल्हेवाडी येथील अमित कोल्हे यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या संगमनेर  तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.नियुक्ती पत्रावर राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांची स्वाक्षरी आहे.कोल्हे यांना निवडीचे पत्र उत्तर नगर युवक जिल्हाध्यक्ष इंजि. युवराज सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले.

     यावेळी सागर शिंदे ,सागर उंबरडे, सुरज गायकवाड आदी उपस्थित होते.या निवडीचे क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील, सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख,शिक्षक क्रांतीसेनेचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडेपाटील व अहमदनगर जिल्हा पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button