अहिल्यानगर
श्रीरामपूर येथे डॉक्टर व आपण चर्चासत्र
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महिला मंडळ श्रीरामपूर यांच्या वतीने डॉक्टर आणि आपण या सत्रात सामाजिक आरोग्य आणि आपण हे चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. मंडळाच्या वतीने पदाधिकारी व अधिकारी यांना आमंत्रित करून काही सामाजिक प्रश्नांची उत्तरे मागितली. यामध्ये नगर परिषद, पंचायत समितीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी म्हणून सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांना आमंत्रित केले होते.
सामान्य नागरिकांना पडलेल्या प्रश्नांची उजळणी झाली. प्रश्न सोडवत असताना प्रशासनाला येणाऱ्या अडचणी त्यांच्या मर्यादा याबद्दल श्रोत्यांना माहिती दिली. नियोजित कार्यक्रम सुसूत्रपणे श्रीरामपूर महिला मंडळाने घेतला. कार्यकारणीने निमंत्रित केल्याबद्दल सर्व महिलांचे मनःपूर्वक आभार डॉ वंदना मुरकुटे यांनी मानले.