अहिल्यानगर
साहित्य क्षेत्रातील युगपुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्यिक सुभाष सोनवणे
समाजकल्याण कार्यालय अहमदनगर व बार्टी समतादूत प्रकल्प अहमदनगर तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी.
अहमदनगर : समाजकल्याण कार्यालय, अहमदनगर व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून १ ऑगस्ट २०२२ रोजी सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय अहमदनगर या ठिकाणी समतादूत यांच्या मार्फत जयंतीनिमित्त व्याख्यान, पोवाडे, लोकगीते, गुणवंताचा सन्मान करून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जीवडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, प्रदेशाध्यक्ष चर्मकार विकास संघाचे संजय खामकर, साहित्यिक तथाा कवी सुभाष सोनवणे, अभिजित ससाणे जिल्हा अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग), डॉ सुरेश पठारे प्राचार्य (सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय), सामाजिक कार्यकर्ते दिनेश देवरे, भैय्यासाहेब बॉक्सर कार्यकारी संपादक (दैनिक अहमदनगर एक्सप्रेस), सुरेश बनसोडे शहर अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग), बहुजन रयत परिषद चे जिल्हाध्यक्ष सत्यवान नवगिरे, शाहीर कृष्णा शिरसाठ व सह कलावंत तसेच अहमदनगर जिल्ह्यातील युवक व युवती या कार्यक्रमाला उपस्थित होते.
गरीब माणूस हा अण्णाभाऊंच्या चरित्राचा चरित्रनायक होता. इथला मजूर समाजातील आदर्शवत नायक असावा संघर्ष शिल नायक निर्माण करण्याच काम अण्णाभाऊंनी आयुष्यभर केले. म्हणूनच लोकशाहिरांच्या विचारधारा समोर नेऊया असे मत सहा. आयुक्त राधाकीसन देवढे यांनी केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे आपल्या मनोगतात म्हणाले की, लोकशाहिरांच्या कामाची प्रेरणा सर्वांनी घ्यावी, अण्णाभाऊंना शाहीर न म्हणता लोकशाहीर म्हणणे हाच त्यांनी केलेल्या कामाचा मोठेपणा राहील. कार्यक्रमात दहावी बारावी मध्ये उच्च श्रेणीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान भारतीय संविधानाच्या उद्देशिका देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
साहित्यिक,कवी सुभाष सोनवणे यांनी साहित्य क्षेत्रातील युगपुरुष अण्णाभाऊ साठे अशा शब्दात अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्व उपस्थितांना सांगून ग्रामीण भागातील व्यथा या कथांच्या माध्यमातून लिहिल्या. यात १३ कथा संग्रह लिहिले, 3 नाट्य, १४ तमाशा वग. रशियात गेल्याच प्रवास वर्णन त्यांनी उत्तमरितीने उपस्थिताना सांगितले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य निर्माण करून सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार अद्याप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मिळू शकला नाही. अशी खंतही व्यक्त केली. कार्यक्रम चे अध्यक्ष संजय खामकर यांनी बार्टी मार्फत लोक जनजागृती सारखे उपक्रम सर्व महापुरूषांचे जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.
शाहीर कृष्णा शिरसाठ व सहकलावंतानी लोकगीत, शाहीर, छकड, पोवाडा व्दारे उपस्थित सर्वांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र व कार्य कलेतुन सादर करून मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष कानडे यांनी केले व आभार एजाज पिरजादे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे चे समतादूत संतोष शिंदे, रजत अवसक, सुलतान सय्यद, रविंद्र कटके, वसंत बडे, प्रेरणा विधाते यांनी परिश्रम घेतले तसेच सीएसआरडी महाविद्यालय चे प्राध्यापक, कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.