पश्चिम महाराष्ट्र
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वतीने भा.कृ.अ.प. चे नवनियुक्त महासंचालक डॉ. हिमांशु पाठक यांना शुभेच्छा
राहुरी विद्यापीठ : बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. हिमांशु पाठक यांची नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या महासंचालकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे यापुर्वीचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांचा कार्यकाल संपल्यामुळे डॉ. हिमांशु पाठक यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या वतीने विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल आणि कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार या अधिकार्यांनी डॉ. हिमांशु पाठक यांचा बारामती येथे शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. पाठक यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर सदस्य म्हणुन कार्य केले आहे.