राजकीय

हिरडगाव सेवा सोसायटीत भरत भुजबळ चेअरमन, शोभाताई दरेकर व्हाईस चेअरमन

श्रीगोंदा ( सुभाष दरेकर ) : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिरडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड आज पार पडली. मा. कै. झुंबरराव दरेकर यांच्या गटाने पुन्हा एकदा आपला प्रभाव दाखवत चेअरमन पदावर भरत भुजबळ तर व्हाईस चेअरमन पदावर सौ. शोभाताई दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित चेअरमन भरत भुजबळ यांनी सांगितले की, “सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाचे सोने करू.” तर व्हाईस चेअरमन सौ. शोभाताई दरेकर म्हणाल्या, “महिलांचा सहभाग वाढवून पारदर्शक व प्रगतिशील कारभार हेच आमचे ध्येय असेल.”

या निवडीवेळी युवा नेते संतोष दरेकर, मिलिंद दादा दरेकर, मा. चेअरमन विजय भुजबळ, मा. व्हाईस चेअरमन नवनाथ गुणवरे, कैलास दरेकर, श्रीकांत भुजबळ, लक्ष्मण दरेकर, अशोक भुजबळ, सर अंकुश ढवळे, मेजर संदीप दरेकर, विठ्ठल ह. दरेकर, देवराव मोरे, मंगलताई दरेकर, विद्याताई ढवळे, मा. उपसरपंच चिमाजी दरेकर, उपसरपंच अमोल दरेकर, रामदास बनकर आदी मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button