राजकीय
कुतुबखेडा सोसायटीच्या चेअरमनपदी हजारे
विलास लाटे | पैठण : कुतूबखेडा-दादेगाव (ता. पैठण) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शशिकला परसराम हजारे तर व्हाईस चेअरमन पदी महेंद्र दिनकरराव गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक अनिल पुरी यांच्या अधिपत्याखाली निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून वैशाली येसगे, सचिव सुनिल इंगळे यांनी काम पाहीले. संबधितांची निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळन करत विजयोत्सव साजरा केला.
नवनिर्वाचित संचालक मंडळात आबासाहेब हजारे, शिवाजीराजे हजारे, नामदेव गहाळ, अपेक्षा भागवत हजारे, शहाजी झिने, सुनिल पठाडे, काकासाहेब कर्डीले, दिलीप गिरी यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पठाडे, सरपंच अनिल हजारे, उपसरपंच सुरेश हजारे, रामकिसन चितळे, आप्पासाहेब करंगळ, अनंतराव हजारे, प्रभाकर हजारे, परसराम हजारे, दिंगबर हजारे, मुरलीधर गहाळ, बापुसाहेब मानमोडे, कल्याण हजारे, भाऊसाहेब हजारे, गणेश गहाळ, विठ्ठल पठाडे, सुनिल चितळे, संपत झिने, महादेव हजारे, उद्धव हजारे, सुरेंद्र गव्हाणे, प्रल्हाद गहाळ, देविदास हजारे, संतोष हजारे, अविनाश हजारे, मनोज हजारे, सुदर्शन हजारे, अशोक भुकेले, जगन्नाथ आढाव आदींनी अभिनंदन केले.