अहिल्यानगर
‘देशभक्ती लेखन पुरस्कारा’बद्दल कुंभार समाजाने केलेला सन्मान प्रेरणादायी- प्रा. दिलीप सोनवणे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मिळालेला ‘देशभक्ती लेखन पुरस्कार’ माझ्या जीवनातील अमृतयोग आहे. त्याबद्दल संगमनेर येथील कुंभार समाज बांधवांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी माझा सन्मान केला, हे माझ्या लेखन आणि संस्कृतीजीवनाला प्रेरणादायी असल्याचे मत सेवानिवृत्त प्रा.दिलीप सुखदेव सोनवणे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या लेखन उपक्रमात सर्वोत्कृष्ट ‘ हर घर तिरंगा ‘ कविता लेखनात प्रा.दिलीप सोनवणे यांनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला. त्याबद्दल 15 ऑगस्टचे औचित्य साधून हा सन्मान करण्यात आला. संगमनेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर आळा येथे सत्कार आणि गोरोबाकाका पतसंस्था कुंभार आळा येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रा.सोनवणे बोलत होते. संत गोरोबा कुंभारकाका पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्रशेठ जोर्वेकर, संतोषशेठ जोर्वेकर, पंडितराव हासे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल देऊन प्रा.सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतशेठ जोर्वेकर, मछिंद्रशेठ जोर्वेकर, सुभाषशेठ जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, पंकज जोर्वेकर, नंदू जोर्वेकर, बाबुराव जोर्वेकर, राहूल जोर्वेकर, मधुकर नालकर, आदिनाथ भांदुर्गे, चंद्रकात मोहारे, कैलास तिदार, धनंजय मुतर्डक, पतसंस्था कर्मचारी, कुंभारसमाज हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितींनी प्रा.सोनवणे यांच्या लेखनाचे कौतुक केले. वाचन संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रा.दिलीप सोनवणे यांनी डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी संगमनेर कुंभार बांधवांचे आभार मानले.