अहिल्यानगर

मांजरी येथे ध्वजारोहण उत्साहात संपन्न

राहुरी : तालुक्यातील पुर्व भागातील मांजरी बिडगर वस्ती शाळेत जवान विक्रम तबाजी विटनोर यांच्या हस्ते तिरंगा फडकवून सलामी देण्यात आली. सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी घोषणा देत परिसर दणाणून गेला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे महत्व मेजर यांनी उपस्थितांना सांगताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत आपल्या भावना व्यक्त करुन सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याने शाळेतील मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Back to top button