अहिल्यानगर
राहुरी शहरात अखंड भारत संकल्प दिना निमित्त भव्य मशाल फेरीचे आयोजन
राहुरी : १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत संकल्प दिन म्हणून साजरा केला जातो. या संकल्पनेत भारताचे भौगोलिक दृष्ट्या एकीकरण होणे आपेक्षित आहे. अखंड भारत संकल्प दिना निमित्त राहुरी शहरातील तसेच तालुक्यातील समस्त युवक मंडळाच्या वतीने शहरातून भव्य मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले.
व्हिडिओ पहा : राहुरी शहरात अखंड भारत संकल्प दिना निमित्त भव्य मशाल फेरीचे आयोजन
यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील हजारो तरुणांनी यामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवून अखंड भारताच्या घोषणा देत संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. आनंदऋषी उद्यानातून सुरु झालेल्या मशाल फेरीची सांगता पुन्हा तेथेच होऊन मान्यवरांनी तरुण युवकांना मार्गदर्शन केले.