महाराष्ट्र

पुणे येथे भारताची सौंदर्यवती मॉडेलिंग शो चे आयोजन

इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार 2024 चे आयोजन

राहुरी | जावेद शेख : भारताची सौंदर्यवती 2024 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठा मॉडेलिंग शो म्हणून रॉयल ग्रुप चा भारताची सौंदर्यवती व भारताचा सम्राट 2024 कडे बघितले जात आहे.

पुणे येथे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे. हा मॉडेलिंग शो व भव्य दिव्य पुरस्कार सोहळा इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9370931509 या नंबर वर संपर्क साधावा व पूर्ण माहिती पाठवावी. मिस्टर, मिस, मिसेस, किड्स असे या सोहळ्याचे स्वरूप आहे.

या शो चे आयोजक नितीन झगरे, असोसिएट डायरेक्टर डॉ. सीमा इंग्रोळे, मॉडेल ममता भोई- दौंडे, मॉडेल साक्षी पाटील, मॉडेल व डान्सर जया कोरे, असिस्टंट डायरेक्टर दीपा पुण्यार्थी, मॉडेल निशा फुलसुंदर, मॉडेल मानसी शर्मा, नाशिक ब्रँड ॲम्बेसेडर भाग्यश्री जाधव, महेश गायकवाड, मॉडेल अ‍ॅड. सुरेखा भोसले, माधुरी जायभाय, ठाणे हेड सुमिता शिंदे, प्रियांका वहिले, डॉ. स्वरांजली गायकवाड, सुमैया पठाण, सितारा महिला बचत गट अध्यक्षा आयेशा तांबोळी, मॉडेल पुष्पा शिंदे, पत्रकार जावेद शेख, राज चामरे, मॉडेल अतुल गुंजाळ, मॉडेल स्वाती राऊत, सल्लागार नितीन खोंड, आकाश रणदिवे, नमिता पाटील, डॉ. रिंकु मोरे यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button