धार्मिक

देवळाली प्रवरातील चोथे वस्ती येथे साई पारायण सोहळ्यास प्रारंभ

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती येथे परिसरातील नागरिक व भारत चोथे मित्र मंडळाच्या श्री. साई चरित्र पारायण सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.

दरवर्षी चोथे वस्ती येथे महंत उद्धव महाराज मंडलीक यांच्या अधिपत्याखाली साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही पारायण सोहळ्यास मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाला आहे. ५० पेक्षा जास्त भाविक पारायणास बसले आहेत. दररोज सकाळी पारायण वाचन, त्याचप्रमाणे दैनंदिन आरती, सायंकाळी प्रवचन व अन्नप्रसाद पंगत दिली जाते. हरिपाठाचे नेतृत्व बाबा महाराज मोरे हे करीत आहेत.

सोमवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. ग्रंथ अवतरणिका व त्यानंतर ९ ते ११ या वेळेत उद्धव महाराज मंडलीक यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार आहे. या पारायणास व्यासपीठ चालक म्हणून साई भक्त श्रीनिवास सहदेव, राहुरी हे सेवा देत आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ चोथे वस्ती व भारत चोथे मित्र मंडळ अथक परिश्रम घेत आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button