राजकीय

भाजपा ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी ताठे

राहुरी : तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी नुकतीच राहुरी तालुका कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी सात्रळ येथील बिपिन ताठे यांची निवड झाल्याने ओबीसी समाजाची तळमळ असणारा एक कार्यकर्ता चांगल्या प्रकारची मोट बांधून पक्षाला नक्कीच बळकटी देईल असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

श्री ताठे यांच्याची संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हिताचे काम यापुढे अधिक जोमाने करील. तसेच ओबिसीचे संगठन करून ओबीसींना न्याय हक्क मिळून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती अतिशय प्रामाणिकपणे व जोमाने पार पाडील. जबाबदारी देणारे आपल्यावर विश्वास दाखवून संघटनात्मक कामासाठी निवड केल्याबद्दल बिपीन ताठे यांनी ना.विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भानगडे, तालुकाध्यक्ष श्री बानकर यांचे त्यांनी आभार मानले. त्यांच्या या निवडीबद्दल सात्रळ पंचक्रोशी मध्ये आनंद व्यक्त होत आहे. या पूर्वी ही जिल्हा सरचिटणीस ओबीसी युवा मोर्चा नगर दक्षिण या पदावर काम करण्याचा अनुभव असून परिसरातील युवकांना बरोबर घेऊन अनेक सामाजिक कामात सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.

भाजपा तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील तसेच मा.आ. शिवाजीराव कर्डीले, नगर दक्षिण चे विद्यमान खा. डॉ.सुजय विखे पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, उपाध्यक्ष अमोल भनगडे, नानासाहेब गागरे, विश्वास कडू, नगरसेवक सुवेंद्र गांधी, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, किरण अंत्रे, रमेश पन्हाळे, सुखदेव ताठे, वसंत डुकरे, बाळकृष्ण चोरमुंगे, संजय नागरे, अप्पासाहेब दिघे, राजेंद्र आनाप, जे पी जोर्वेकर, चंदन ताठे, नगराध्यक्ष सत्याजित कदम आदी मान्यवरांनी श्री. ताठे यांचे अभिनंदन केले तसेच ग्रामीण भागात युवकांना जास्तीत जास्त भाजपा मध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने पुढील वाटचाल करणार असल्याचे सूचित केले. बिपीन ताठे यांच्या निवडीबद्दल सात्रळ, सोनगाव, धानोरे, माळेवाडी, डुकरेवाडी, तांभेरे, कानडगाव परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button