ठळक बातम्या
शेतकऱ्यांना भुभाडे द्या अथवा विज मोफत द्या – ॲड. अजित काळे यांचा सरकारला इशारा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शेतकऱ्यांच्या शेतात विज वितरण कंपनीने उभारलेल्या डीपी, तारा, पोल, ताण टॉवर यासाठी वापरत असलेल्या जागांचे भुभाडे विज कंपनीने शेतकऱ्यांना देणेबाबत याचिकेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रविवार दि 25 सप्टेंबर रोजी झालेल्या जाहीर सभेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्ष स्थानी कारेगावचे प्रगतशील शेतकरी लक्ष्मण पटारे होते.
ॲड अजित काळे यांनी मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेच्या अनुषंगाने भुभाडे देणेची तरतूद ब्रिटिश कायदा 1885 नुसार देणे विज कंपनीला बंधनकारक आहे. त्यामुळे या शेतकरी जनजागृती मोहिमेची सुरुवात श्रीरामपूर तालुक्यात संघटनेचे ता. अध्यक्ष युवराज जगताप यांनी पुढाकार घेऊन कारेगाव येथून केली. या मागणीचे फॉर्म भरून शेतकरी संघटनेकडे देण्याचे आव्हाहनही ॲड. काळे यांनी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देेण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. यावेळी प्रहारचे अप्पासाहेब ढूस यांच्यासह अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शासन ६७ टक्के वीजबिल कंपनीला देत आहे. परंतु विज कंपनी तेहतीस टक्केच विज देते. त्यामुळे शेतकऱ्यांचेच जास्तीचे पैसे कंपनीकडे गेले. त्यात आता भुभाडेचा विषय वेगळाच आहे. त्यात कंपनी डीपी जळाल्यावर बिल भरल्याशिवाय दुरुस्त करून देत नाही त्याही बाबद शेतकऱ्याच्या बाजूचा कायदा आहे. प्रति ग्राहक पन्नास रुपये प्रति तास या प्रमाणे नुकसान भरपाई मागण्याची तरतुदही आहे. त्यामुळे येथून पुढे शेतकऱ्यांना संघटित लढा द्यावा लागेल आपण साथ द्या, आम्ही संघर्ष करण्यास तयार आहोत. असे औताडे म्हणाले.
यावेळी प्रहारचे आप्पासाहेब ढूस म्हणाले की, ज्यावेळी शेतकरी प्रश्न येतो त्यावेळी प्रहार शेतकऱ्यांबरोबर असतेच व मागील काळातही शेतकरी संघटनेबरोबर काम केले आहे व येथून पुढेही करणार असल्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रुपेंद्र काले, ता. अध्यक्ष राहुरी नारायण टेकाळे, नेवासा ता अध्यक्ष हरिभाऊ तुवर, देवळालीचे प्रशांत कराळे, जेष्ठ कार्यकर्ते सुदामतात्या औताडे, प्रभाकर कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ दादासाहेब आदिक, भास्कर तुवर, डॉ. नवले, युवा आघाडीचे शरद आसने, संदीप उघडे, इंद्रभान चोरमळ, अरुण कवडे, अकबर शेख, बबन उघडे यांच्यासह कारेगाव पंचक्रोशीतील रमेश उंडे, रमेश पटारे, सुनिल पटारे, लक्ष्मण भवार, अनिल कहांडळ, बाळासाहेब पटारे, डी.वाय. पटारे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थीतांचे आभार आण्णासाहेब शेळके यांनी मानले.