सात्रळ महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन
राहुरी | बाळकृष्ण भोसले : ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी पीएसआय, तहसीलदार, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर इ. पदांसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील ए. के. स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे प्रमुख अमोल गव्हाणे यांनी केले.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य मंडळाचे चेअरमन डॉ. व्हि. जी. शिंदे यांनी केले. तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. अमोल गव्हाणे ए. के. अकॅडमी स्पर्धा परीक्षा पुणे, हे कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) पी. एम. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. डी. एन. घोलप, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. आभार वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. डी. एन. घाणे यांनी केले. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.