मराठवाडा
गावोगावी अभ्यासिका व वाचनालय स्थापन करणे काळाची गरज – तहसीलदार स्वरूप कंकाळ
राहुरी | जावेद शेख : जनसेवा फाउंडेशन बोरगाव बुद्रुक शाखेतर्फे दहावी व बारावी शालांत परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा तसेच ग्रामपंचायत च्या संपूर्ण सदस्यांचा ऑफिस डायरी व पेन देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावी व बारावी शालांत परीक्षेतील गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त निकिता बबन फदाट,प्रिया भगवान खंदारे, दीपक किशोर वाघ, आरती रमेश फदाट,आरती ज्ञानेश्वर फदाट, शिवानी मोहन फदाट या विद्यार्थ्यांचा तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या समीक्षा दादाराव गंगात्रे या विद्यार्थिनीचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जाफराबाद चे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी गावोगावी वाचनालय व अभ्यासिका तयार करणे ही काळाची गरज असून तरुणांनी मोबाईल पासून दूर रहात आपल्या ज्ञानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी तथा विधायक कार्यासाठी करण्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले गटशिक्षणाधिकारी भरत वानखेडे यांनी दहावी बारावी मध्ये गुणवंत पुरस्कार प्राप्त मुलींना यापुढेही उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे आवर्जून सांगितले. यावेळी जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री तायडे, साधन व्यक्ती नारायण पिंपळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगताप व प्राचार्य श्री खेडेकर, हरिदास जोशी विनोद फदाट, लालसिंग देशमुख, प्रमोद वाघ, विजय कुठंबरे, संजय खंदारे, तुकाराम फदाट, दामोदर फदाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ चव्हाण, प्रास्ताविक संदीप जाधव व आभार प्रदर्शन राहुल फदाट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनचे सदस्य हर्षल पाटील फदाट, ओम खंदाडे, सुनील फदाट, संदेश फदाट, गणेश फदाट यांनी परिश्रम घेतले.