सामाजिक

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा : सौ धनश्रीताई उत्पात

राहुरी | अशोक मंडलिक : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना व फिनोलेक्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट व वारकऱ्यांसाठी बॅग वाटप करण्यात आल्या.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे घेण्यात आला. सालाबाद प्रमाणे यावेळीही पोलीसांना आपले सहकार्य राहील असे प्रतिपादन संघटनेच्या विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सौ धनश्रीताई उत्पात यांनी केले आहे.

यावेळी पंढरपूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत तसेच फुगे सर तर फिनोलेक्स कंपनी च्या वतीने स्टेट हेड महाराष्ट्र व गोवा विश्वजीत हरगुडे, असिस्टंट मॅनेजर गोपाळ आदोने व अजित खटावकर तसेच संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दिनेश काटकर, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ ज्योती शेटे, पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष कैलास कारंडे, तालुका सदस्य संजय चव्हाण शिवलिंग वसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button