अहिल्यानगर
अंगणवाडी सेविकेच्या वारसदारास माजी राज्यमंत्री तनपुरेंच्या हस्ते धनादेश सुपूर्द
राहुरी शहर | अशोक मंडलिक : कोरोनाच्या काळात सेवेत असताना अंगणवाडी सेविका निर्मला दुर्गादास घाडगे यांचे दुर्दैवी निधन झाले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनाने शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर त्यास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती.
त्यानुसार मयत निर्मला घाडगे यांचे वारसदार मुळा नगर येथील दुर्गादास घाडगे यांना माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यापूर्वीही या योजनेनुसार धनादेश वितरित करण्यात आले होते. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात काही शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले. यात मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या होत्या.