ठळक बातम्या
आ. रवी राणा विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार
राहुरी – आमदार रवी राणा यांनी दिव्यांगांचे कैवारी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वरती केलेल्या गलिच्छ आरोपां विरोधात राहुरी पोलीस स्टेशन मध्ये राहुरी तालुका प्रहार दिव्यांग सघटनेच्या वतीने तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
बच्चुभाऊ कडू यांनी गोवाहटीला जाऊन खोके घेतल्याचा बिनबुडाचा आरोप आमदार रवी राणा यांनी गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी आपल्या भाषणात केला होता. त्यांचा जाहीर निषेध करत राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आला. बच्चुभाऊ कडू यांनी 2012 साली प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची स्थापना केली. तेव्हा पासून महाराष्ट्रभर विविध आंदोलने करून दिव्यांगांसाठी 56 शासन निर्णय सरकार ला काढणे भाग पाडले. तसेच 1995 दिव्यांग कायद्याचे खऱ्या अर्थाने अंमलबजावनी केली. दिव्यांग स्वाभिमानाने जगतायेत.
महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी देवमाणूस आहे अशा माणसावरील आरोप महाराष्ट्रातील दिव्यांग कदापि सहन करणार नाही असा इशारा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे मधुकर घाडगे यांनी दिला आहे. शिंदे- फडणवीस सरकारने अशा आमदाराची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका सल्लगार सलीम शेख, तालुका सचिव योगेश लबडे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, प्रहार सैनिक विष्णू ठोसर, सुखदेव कीर्तने उपस्थित होते.