‘स्टेट बँक आपल्या दारी’ या उपक्रमाचा अधिकाऱ्यांनी केला गौरव
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अग्निपंख फाउंडेशन व सुमित फोटो जानकी एजन्सी यांच्या सौजन्याने तिसरा ‘स्टेट बँक आपल्या दारी’ उपक्रम लोकाग्रहात्सव उंदीरगाव आऊटसाईड व हरेगाव ठिकाणी राबवण्यात आला.
शिबिरात ग्राहक सेवा संचालक नवनाथ शेलार यांनी नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जनधन खाते यांचे महत्त्व विशद करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा हरेगाव, उंदीरगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेतला आणि अग्निपंख फाउंडेशन तर्फे आज ओपन केलेल्या खातेधारकांना लोकांना मोफत दोन लाखांचा अपघाती विमा काढून देण्यात आला.
यावेळी कॅम्पला भेट देण्यासाठी एसबीआय क्षेत्रीय व्यवस्थापन कार्यालय, अहमदनगरचे व्यवस्थापक महेश लगडे, संजीवनी विकास फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अमोल जवणे, जिल्हा प्रतिनिधी साक्षी जवणे यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. बचत गटातील महिला व पुरुषांसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असुन 10 वर्षावरील मुले, मुली, विद्यार्थी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, ते सुद्धा या बँकेत नवीन खाते उघडण्यास पात्र असल्याचे बँक अधिकारी महेश लगडे यांनी सांगितले. यावेळी अग्निपंख फाउंडेशनचे संस्थापक स्वप्निल पंडित, कार्याध्यक्ष महेश निकम यांनी मोलाचे सहकार्य केले.