शिक्षणवारी ज्ञान पंढरी
कुमारी नेहा नवनागे यांना डॉक्टरेट पदवी
राहुरी | जावेद शेख : कुमारी नेहा नवनागे यांनी मृदविज्ञान व कृषी रसायन शास्र या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली. त्यांनी अशोक फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ” वेगवेगळ्या आकुंचन पावलेल्या मातीच्या मालिकेतील आंब्याच्या बागेमुळे प्रभावित झालेले स्थलीय कार्बन साठा आणि खोलीनुसार मातीतील कार्बन अंशांचा अंदाज ” या विषयावर शोधनिबंध सादर केला.
त्यांच्या या शोधनिबंधामूळे वातावरणातील कार्बन संचयित करण्यासाठी आंबा बागेची क्षमता दर्शवते. कोरोना सारख्या परिस्थितीत सुद्धा अथक परिश्रम घेऊन कुमारी नेहा यांनी आचार्य पदवी मिळवली असल्याने त्यांचे विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. या शोधनिबंधासाठी त्यांना म फु कृ विद्यापीठ अधिष्ठाता डॉ. रसाळ तसेच मृदविज्ञान व कृषीरसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाकरे तसेच डॉ. कडलग सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर भारत हरिश्चंद्रे, प्रसाद आढाव, रणजीत पाटील व श्री ढगे यांचे विशेष सहकार्य लाभले.